![]() |
कोणत्याही मुंबईकराला विचारले...... "तुझे आवडते दैवत कोणते?" तर बहुतेक मुंबईकर म्हणतील 'गणपती'. या बाप्पांना आपल्या घरी आणून विराजमान करता यावे आणि मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी असा सण म्हणजे 'गणेश चतुर्थी'.
याच सणाच्या एक दिवसा पूर्वी दादर मध्ये असलेल्या कबुतरखाना जवळच बाप्पाच्या अनेक मूर्ती येथे वीक्रिकरिता ठेवतात त्यातीलच ही एक मूर्ती. कबुतरखाना बाजूलाच असल्या कारणाने अधून मधून कबुतर आकाशात झेप घेत असत. बाप्पाच्या मूर्ती मागे इमारती आणि वरून आकाशाकडे झेप घेणारी कबुतरे.....जणू काही बाप्पा चा आगमनासाठी सर्व काही सज्ज आहे असेच वाटत आहे.....
फोटो आणि लेखन :- आदेश अ. पोखरे-चौधरी.

No comments:
Post a Comment